Slider Maker by WOWSlider.com v4.8

            भारतात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणकीय क्षेत्रातील MCA पदवी संपादित केली. सोबतचे अनेक मित्र वेगवेगळ्या कंपनीत नोकरीत रुजू झाले नक्की जॉब करावा की पुढील शिक्षण हा यक्षप्रश्न समोर उभा राहिला. काही महिने इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीत काम केले परंतु तेथेही मन रमले नाही. दरम्यान NSS (राष्ट्रीय सेवा योजना) च्या माध्यमातून कोहिनकरवाडी गावाची वेबसाईट बनविण्याची संधी प्राप्त झाली. वेबसाईटचे बेसिक ज्ञान होते. पण हे आव्हाहन स्वीकारले. दोन महिन्यात या गावाची पुणे जिल्ह्यातील पहिली वेबसाईट बनविण्याचे भाग्य मला मिळाले. आणि निर्णय ठाम झाला आता नोकरीच्या फंदात न पडता. उपजत ज्ञानाच्या कक्षा रुंदावत स्वत:ची पाऊलवाट निर्माण करायची. आता फक्त एकच स्वप्न वेबसाईट बनविण्याचे... आणि तिथून स्वप्नवेब सोल्युशन संकल्पनेचा उदय झाला.
            वेबसाईट बनवून देणाऱ्या अनेक वेबकंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण स्वप्नवेब सोलुशन एकमेव असे सेंटर आहे कि जे मुळातच आपल्यापुढे मायबोलीत सादर झाले आहे. आमचा मुख्य उद्देश हाच आहे कि, ज्याप्रमाणे दक्षिण भारतातील राज्ये आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात शिवाय तंत्रज्ञानातही त्यांची अफाट प्रगती आहे. अगदी त्याप्रमाणे आपलीही तंत्रज्ञानामध्ये गरुडझेप गेली पाहिजे. मराठी भाषा आणि त्याचे सौंदर्य जास्तीत जास्त वृद्धिंगत झाले पाहिजे. या भूमिकेतून अनेक वेबसाईट बनविल्या कुणाची व्यावसायिक वेबसाईट, प्रतिष्ठानची वेबसाईट, व्याख्यांत्यांची वेबसाईट, शैक्षणिक संस्था-शाळांच्या वेबसाईट, गावांच्या वेबसाईट यात प्रामुख्याने तब्बल ५० शाळांच्या वेबसाईट चित्रिकरणासहित बनविल्या.
             शहरात ज्या लोकांचा व्यवसाय आहे. त्या प्रत्येक व्यावसायिकाची स्वतःची वेबसाईट असते. थोडक्यात इंटरनेटवरील पुस्तकच. ग्रामीण भागात सुध्दा याचा प्रसार व्हावा या जाणीवेने मी सज्ज झालो होतो. परंतु ग्रामीण भागात याविषयीची विशेष जागरूकता नव्हती म्हणून व्हिडीओ जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले. दरम्यान क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ट्रान्स बनविण्याची कला अवगत केली. आणि मग तिथून निवडणुकीची प्रचार क्लिप, व्यावसायिक जाहिराती, शासकीय विभागांच्या विविध डॉक्युमेंटरी, प्रेसेंटेशन, LED स्क्रीन जाहिराती अशी अनेक कामे सुरु झाली. हळू हळू वेबसाईटचा कल या विभिन्न क्षेत्राकडे झुकू लागला. आज स्वप्नवेब सोल्युशनला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान अनेक कामांचा अनुभव गाठीशी बांधता आला. आणि म्हणूनच एक नव्या आणि साध्या पद्धतीने वेबसाईटच्या स्वरूपात त्या साऱ्या अवगत बाबींचा उहापोह सविनय सादर...

Web Hosting Linux Reseller Hosting